Wed. Jul 8th, 2020

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, ९४ कोटींचा गंडा…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुण्यातल्या कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला झाल्याने बँक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. गणेशखिंड रोडवरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर सायबर हल्ला झाला असून हॅकरने जवळपास १५ हजाराहून अधिक व्यवहार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून सुरक्षेच्या कारणासाठी कॉसमॉस बँकेचे एटीएम दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे.

कसा घडला हा प्रकार? – 

 • ११ ऑगस्टला दुपारी ३ ते रात्री १० आणि १३ ऑगस्टला सकाळी साडेअकरापर्यंत घडला.
 • ११ ऑगस्टला झालेल्या हल्ल्यात कॅनडा सह २४ देशातून केवळ २ तासात ८० कोटी रुपये काढले गेले.
 • १३ ऑगस्टला दुपारी १३ कोटी ९२ लाख रुपये काही मिनिटांत हाँगकाँगमधील एका खात्यात वळविण्यात आले व तातडीने ते काढून घेतले गेले.
 • एकाचवेळी इतके इंटरनॅशनल व्यवहार होत असल्याचे पाहून व्हिसा कार्ड देणाऱ्या कंपनीने ही बाब रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आणून दिली.
 • त्यांनी तातडीने कॉसमॉस बँकेला याची कल्पना दिली. रविवारी संपूर्ण दिवस बँकेचे अधिकारी व तज्ज्ञ या सर्व व्यवहाराची माहिती घेत होते.
 • त्यानंतर सोमवारी दुपारी पुन्हा झालेल्या सायबर हल्ल्यात १३ कोटी ९२ लाख रुपये हाँगकाँगला वळविण्यात आले.

कसे झाले व्यवहार –

 • कॉसमॉस बँकेचे गणेशखिंड रोडवर कॉसमॉस टॉवर येथे मुख्यालय 
 • तेथे असलेल्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर कोणीतरी मालवेअरचा हल्ला 
 • बँकेच्या काही व्हिसा व रुपी डेबीट कार्डधारकांची माहिती चोरुन त्याद्वारे व्हिसाचे अंदाजे १२ हजार व्यवहारले
 • याद्वारे ७८ कोटी रुपयांचे व्यवहार भारताबाहेर  झाले
 • तसेच रुपे कार्डचे २ हजार ८४९ व्यवहारांद्वारे २ कोटी ५० लाख रुपयांचे भारताबाहेर गेले 
 • एकूण १४ हजार ८४९ व्यवहारांसाठी ट्रान्झॅक्शन रिक्वेस्टस व्हिसा व एनपीसीआय यांना कॉसमॉस बँकेने मान्यता दिल्याचे भासवून कोणी तरी त्या अप्रुव्ह केल्याचे भासवून त्याद्वारे ८० कोटी रुपये काढून घेतले होते. 
 • त्यानंतर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हॅकरने स्विफ्ट ट्रान्झॅक्शन रिक्वेस्टस व्हिसा व इनिशिएट करुन हाँगकाँग येथील हॅनसेंग बँकेच्या एएलएम ट्रेडिंग लिमिटेड यांच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करुन ते काढून घेतले.
 • अशा प्रकारे हॅकरने तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा कॉसमॉस बँकेला गंडा घातला असून या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बँकेच्या खातेदारांवर याचा काय परिणाम होणार आहे 

 • बँकेच्या खातेदारांवर या व्यवहारांचा काहीही परीणाम होणार नाही. 
 • एकाही खातेदाराच्या खात्यातून हे पैसे गेलेले नाहीत. 
 • परिणामी, या सायबर हल्ल्याची झळ खातेदारांना बसणार नाही. 
 • या सर्व ट्रान्सॅक्शन मधून बँकेचे प्रत्यक्षात कीती पैसे गेले आहेत याची माहीती बँक घेत आहे.
 • इतर बँकाशी रिकन्सीलेशन झाल्यानंतर हा आकडा समोर येईल.
 • त्यामुळे 94 कोटी रुपयांचा आकडा खाली येऊ शकतो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *