Sun. Apr 18th, 2021

सायकलिंगचे महत्व पटवून देण्यासाठी अलिबागमध्ये ‘सायक्लोथॉन’

सध्याच्या घडीला लोकांचा सायकलिंगकडे ओढा वाढलेला आहे. सायकलिंगमुळे व्यायाम होतो, तसेच शरीरदेखील स्वस्थ राहतं.

या सायकलिंगचं महत्व पटून देण्यासाठी अलिबागमध्ये ‘सायक्लोथॉनचे म्हणजेच सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं.

इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबाग शाखेतर्फे सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आलं होतं.

या सायकल रॅलीत १५० पेक्षा अधिक सायकलस्वारांनी सहभाग घेतला होता.

क्रीडा भुवन येथून या सायकल रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत डॉक्टर, समाजसेवी संस्था, सर्वसामान्य नागरिक आणि लहान मुलं देखील सहभागी झाली होती.

यावेळेस पॅडल फॉर हेल्थ, पॅडल फॉर नेचर अशा घोषणा देण्यात आल्या.

सायकल चालवण्याने आरोग्याला होणारे फायदे आणि त्याबाबत जनजागृती, या उद्देशाने या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *