गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच परिवारातील 5 जण गंभीर जखमी

गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना मुंबईनजीकच्या नालासोपाऱ्यात घडलेली आहे. वसईत हा गॅस सिलेंडर स्फोट झाला आहे. नालासोपारा पूर्वेमधील संतोष भुवन परिसरात ही घटना घडली आहे.
या स्फोटात एकाच कुटुंबातील ५ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ४ महिन्यांचा चिमुरड्याचा समावेश आहे. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाला नसला तरी, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये घराच्या वरचा भाग कोसळला आहे. यावरुन हा स्फोट किती भंयकर होता, याचा अंदाज येतो.
या स्फोटात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. दरम्यान या सर्व घटनेचा पोलिसांकडून तपास करत आहे. तुळींज पोलिसांकडून अधिक तपास करत आहे.