फुगे फुगवणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट, मुलीचा मृत्यू

नाशिक : घोडेगाव येथे फुगे फुगवणाऱ्या गॅस सिलेडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
मालेगाव तालुक्यातील घोडेगावातील पिरबाबा यात्रेत ही घटना घडली आहे. आज सोमवारी (16 डिसेंबर) सकाळी 8.30 वाजता घोडेगाव येथील खडक वस्तीत हा स्फोट झाला. या स्फोटात गावातील 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सोनी सुभाष गांगुर्डे असं मृत मुलीचे नाव आहे.
तसेच या स्फोटात जखमी झालेल्यांना मालेगाव येथील सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.