Wed. Jan 26th, 2022

उत्तर प्रदेशात सिलिंडरचा भीषण स्फोट

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एका इमारतीत झालेल्या सिलिंडर स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री ही दुर्घटना घडली असून मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचासुद्धा समावेश आहे.

हा स्फोटामध्ये दोन घरं जमीनदोस्त झाली असून अडकलेल्या लोकांना पोलिसांच्या मदतीनं गावकऱ्यांनी बाहेर काढलं. मृतांमध्ये २ पुरुष, २ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे. तर जखमींना प्राथमिक उपचारानंतर लखनऊ येथील ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे.

स्फोटाचं नेमकं कारण शोधून काढण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं असून सिलिंडर स्फोटामुळे घराचं छत कोसळल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *