Sat. Feb 27th, 2021

कर्नाटकातील कॉंग्रेसचे संकटमोचक डी. के शिवकुमार यांची होणार ईडीकडून चौकशी

कर्नाटकातील कॉंग्रेस नेते आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे डी. के शिवकुमार यांची ईडी चौकशी करणार आहे. कॉंग्रेसचे संकटमोचक संकटात सापडले असून ईडी त्यांची लवकरच चौकशी करणार आहेत. डी. के शिवकुमार यांनी ईडीचे समन्स रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र गुरुवारी उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

कर्नाटकाचे कॉंग्रेस नेते डी. के शिवकुमार यांना 2018 साली ईडीची नोटीस बजावली होती.

डी. के शिवकुमार यांनी ईडीचे समन्स रद्द करणारी याचिका न्यायालयाकडे केली होती.

मात्र उच्च न्यायालयाने गुरुवारी डी.के शिवकुमार यांची याचिका फेटाळली आहे.

त्यामुळे आज दुपारी म्हणजेच शुक्रवारी दिल्लीत डी.के शिवकुमार यांची चौकशी होणार आहे.

करचोरी, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीचे समन्स डी. के शिवकुमार यांना देण्यात आल्याचे समजते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *