राष्ट्रवादीचे माजी खासदार डी.पी. त्रिपाठी यांचे दिर्घ आजाराने निधन

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार डी.पी. त्रिपाठी यांची दिर्घ आजाराने दिल्लीमध्ये प्राणज्योत मालवली आहे. त्यांचे वय 67 वर्ष होते.
त्रिपाठी यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत काम केले होते. शरद पवारांच्या विश्वासू व्यक्तींमधील त्रिपाठी होते.
उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये डी.पी. त्रिपाठी यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी 1968 मध्ये राजकारणात सक्रीय झाले होते.
सुरवातीला राजीव गांधीसोबत असलेले संबंधामुळे त्यांनी कॉग्रेस पक्षातून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर सोनिया गांधीबरोबर झालेल्या मतभेदांमुळे ते कॉग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता.
त्रिपाठी अनेक महिन्यांपासून आजांराशी लढा देत होते. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्रिपाठी हे कार्यात आक्रमक नेते अशी त्यांची ओळख होती. त्रिपाठी यांच्या निधनाने अनेक राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्रिपाठींच्या निधनानंतर सोशल मीडियातून दु:ख व्यक्त केले आहे.