सलमान खानने शेअर केले सई मांजरेकरसह दबंग-3 चित्रपटाचे फोटो

सलमान खानचा यावर्षी दबंग-3 हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात सलमान बरोबर मराठी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर दिसणार आहे. या नवीन जोडीमुळे सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरू आहे.
दरम्यान सलमान खानने दबंग-३ या चित्रपटाच्या सेट वरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो सई मांजरेकरसह नदी किनारी उभा आहे.सई मांजरेकर दबंग-३ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. दबंग-३ मध्ये सई मांजरेकर तरुण चुलबूल पांडेच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सई मांजरेकर, सलमान खान सोबत अरबाज खानसुद्धा दिसणार आहेत. यामुळे सगळ्यांनाच या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.