Sun. May 9th, 2021

मुंबईच्या डब्बेवाल्यांना शाळांमध्ये प्रवेशबंदी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दक्षिण मुंबईतील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मधल्या सुटीमध्ये डबा पोहोचवण्याचे काम डबेवाले करतात. मात्र मागील शैक्षणिक वर्षापासून या शाळांनी डबेवाल्यांना हे डबे आणण्यास बंदी केली.

 

ही बंदी हटवावी, अशी मागणी मुंबईतील डबेवाल्यांनी केली. शाळेत दिल्या जाणाऱ्या जंक फूडवर राज्य सरकारने बंदी घातली. मात्र घरचा डबा पोहोचता करणाऱ्या डबेवाल्यांवर निर्बंध का घालण्यात आले आहेत असा प्रश्न मुंबई डबेवाला संघटनेने उपस्थित केला.

 

ज्या पालकांना डबेवाल्यांमार्फत आपल्या मुलांना डबे द्यायचे आहेत त्यांना ते नेऊ द्यावेत अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *