दगडूशेठ बाप्पाला भरजरी ‘अलंकार’ !
जय महाराष्ट्र, पुणे
पुण्यातील सुप्रसिद्ध सोन्याची पेढी असलेले ज्वेलर्स दाजीकाका गाडगीळ म्हणजेच PNG ज्वेलर्स. PNG ज्वेलर्सनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पासाठी नवीन
अलंकार बनवले आहेत. नवीन अलंकार बनवण्याची सुंदर चित्रफीत सोशल मीडियावर वायरल झाली आहे.
अप्रतिम कलाकृती, बारीक नक्षीकाम आणि असंख्य कारागिरांची हातकला, त्यांनी बनवलेले बाप्पाचे अलंकार बघूनही तुम्हीही आवाक् झाल्याशिवाय राहणार नाही. कान,
अंगरखा, सुवर्णमुकट, यात वेगवेगळ्या सात जाळी आणि सात विविध प्रभावळ, यासारख्या वेगवेगळ्या अलंकारांनी दगडूशेठ बाप्पाला ंमढवण्यात आले आहे. पाच
महिन्यांपासून 40 कारागिर, त्यांची कलाकृती या कामासाठी कार्यरत आहे.