आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन

आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत आणि दलित पॅंथरचे संस्थापक राजा ढाले यांचे आज पहाटे मुंबईत दुखद निधन झाले. नामदेव ढसाळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या सहाय्याने दलित पॅंथर संघटनेची स्थापना केली होती. मुंबईतील विक्रोळी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन –
दलिक पॅंथरचे संस्थापक आणि बंडखोर लेखक म्हणून ओळखले जाणारे राजा ढाले यांचे आज पहाटे निधन झाले.
मुंबईतील विक्रोळी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
उद्या दुपारी 12 वाजताच्या सुमारास विक्रोळीत त्यांच्या निवासस्थानापासून दादर चैत्यभूमीपर्यंत अंत्ययात्रा सुरू होणार आहे.
दादरच्या चैत्यभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राजा ढाले गटाचे प्रमुख होते.