Fri. Dec 3rd, 2021

सांगली येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ

सांगली येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्याने नदीकाठच्या सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे या भागातील १५ घरांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सु चनेनुसार सांगली शहरात कृष्णेची पातळी ३९ फुटावर पोहचली आहे यामुळे शहरातील कर्नाळ रोड, सुर्यवंशी प्लॉट , इनामदार प्लॉट आदि नागरी वस्तीतील ५० हुन अधिक कुटुंबांचे महापालिका प्रशासनाने स्थलांतर केले आहे. पाणी पातळी वाढणेच्या शक्यतेने अनेक बाधित होणाऱ्या भागातून नागरिक स्वतःहून स्थलांतरित होत आहेत. यासह जिल्ह्यात अनेक गावानांही पुराच्या पाण्याने वेढा दिल्याचे चित्र आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती पाहता मदतकार्यासाठी एनडीआरएफची एक तुकडी सकाळी १० वाजेपर्यंत सांगलीत दाखल होत असून ज्या भागात पूरस्थिती गंभीर आहे अशा ठिकाणी लोकांच्या मदतीसाठी जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *