डेव्हिड वॉर्नरचा तडाखा, झळकावलं त्रिशतक

एडलेड : टीम ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरने त्रिशतक ठोकलं आहे. वॉर्नरने ही कामगिरी पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत केली आहे. वॉर्नरने नाबाद 335 धावा केल्या आहेत. वॉर्नरने या खेळीत 39 चौकार आणि 1 सिक्स लगावला.
वॉर्नरला ब्रायन लाराच्या 400 धावांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. पण ऑस्ट्रेलियाने 3 बाद 589 धावांवर डाव घोषित केल्याने वॉर्नरची ही संधी हुकली.
वॉर्नरची कसोटी कारकिर्दीतील पहिलीच त्रिशतकी खेळी ठरली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतकी खेळी करणारा वॉर्नर हा सातवा खेळाडू ठरला आहे. सोबतच टेस्ट क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत वॉर्नर 10 व्या क्रमांकावर पोहचला आहे.
टेस्ट कसोटीमध्ये वैयक्तिक सर्वोच्च खेळी ब्रायन लाराची आहे. लाराने इंग्लंड विरोधात 400 धावांची नाबाद खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियाकडून खेळताना टेस्टमध्ये वॉर्नरची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाची वैयक्तिक सर्वोच्च खेळी मॅथ्यू हेडनने झिम्बाब्वेविरुद्ध केली होती. हेडनने 380 धावांची खेळी 2003 साली केली होती.
मार्क टेलरने पाकिस्तान विरुद्ध पेशावर येथे 1998 ला झालेल्या टेस्टमध्ये 334 धावांची नॉट आऊट खेळी केली होती. तर सर डॉन ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्ध 334 धावा केल्या होत्या.
दरम्यान बॉल टेम्परिंग डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची कारवाई करण्यात आली होती.