Wed. Jan 19th, 2022

धक्कादायक ! मृत कुत्र्याला दुचाकीला बांधून ओढले; प्राणी मित्र संतापले

सांगलीमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्याने मृत कुत्र्याला दुचाकीला बांधून रस्त्यावर ओढत घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मृत कुत्र्याला दुचाकी वाहनाला बांधून ओढत घेऊन गेल्यामुळे प्राणी मित्र नाराज झाले असून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच प्राणी मित्र आयुक्ताकडे तक्रार करणार आहे.

नेमकं काय घडलं ?

सांगली येथे शिवशक्ती व्यायाम मंडळ येथील महापालिकेच्या कर्मचाऱ्याने एका धक्कादायक प्रकार केला आहे.

रस्त्यावर मृत कुत्र्याला कर्मचाऱ्याने दुचाकी वाहनाला बांधून घेऊन गेला आहे.

हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या घटनेमुळे प्राणी मित्रांनी निषेध केला असून सांगलीच्या महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *