Mon. Apr 6th, 2020

Video: बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जांबुत गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जांबुत गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समृध्दी योगेश जोरी असे या चिमुकल्या मुलीचे नाव असून रात्री ही समृद्धी घरासमोरील ओट्यावरती खेळत असताना बिबट्याने या मुलीवर हल्ला करत तीला ऊसाच्या शेतात ओढत नेले. या मुलीचा रात्री उशीरापर्यंत घरच्यांनी शोध घेतल्यानंतर या मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात मिळाला आहे.या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून या बिबट्याला पकडण्याचे मोठे आव्हान आता वनविभागापुढे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *