Tue. Mar 9th, 2021

मुंबईत एक कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, पुण्यातही एका कोरोनाग्रस्ताचा बळी

कोरोनाविरोधात महाराष्ट्र लढा देत आहे. लॉकडाऊननंतर कोरोनाची लागण रोखण्यासाठी महाराष्ट्र लढत आहे. मात्र तरीही अद्याप अपेक्षित यश मिळालेलं नाही. मुंबईमध्ये आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. फोर्टिस रुग्णालयात ८० वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

या व्यक्तीने परदेश प्रवास केला नव्हता. तरीही त्यांना कोरोनाची लागण कशामुळे झाली, याची माहिती मिळवण्यात येत आहे. आता या व्यक्तीच्या नातेवाईकांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

पुण्यात देखील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुण्यातला हा कोरोनाचा पहिला बळी आहे. पुण्यामध्ये ३१ कोरोनाग्रस्तांचे उपचार सुरू आहेत. त्यातील ७ जणांवर उपचार यशस्वी झाले आहेत.  मात्र एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. २१ मार्च रोजी या व्यक्तीला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीदरम्यान या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. या व्यक्तीला ब्लड प्रेशर आणि फुप्फुसांचा त्रासदेखील असल्याचं दिसून आलं होतं. आज सकाळी त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *