कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय

कोरोनाचं संकट रोखण्यासाठी जरी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असला, तरी महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहेत. कल्याण- डोंबिवली येथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोच आहे. त्यामुळे ७ एप्रिलपासून कल्याण-डोंबिवलीतील भाजी आणि किराणा मालाची दुकानं संध्याकाळी ५ नंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आळाय.
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये, म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रासाठी साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे संध्याकाळी ५ नंतर मेडिकल स्टोअर्स, क्लिनिक्स सुरू राहतील. मात्र जीवनावश्यक वस्तूंची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. दुग्धजन्य पदार्थांची दुकानं, भाजीपाला, बेकरी किराणा मालाची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत.
जर रुग्णालयं, क्लिनिक्स, मेडिकल स्टोअर्स व्यतिरिक्त जी दुकानं नियमभंग करून सुरू राहतील, त्यां दुकानांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.