Fri. Apr 23rd, 2021

रेल्वे प्रशासनाचा निर्णय, स्थानकावर मिळणार वैद्यकीय सुविधा

रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच सुविधा देण्यात येतात. आता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी नवा निर्णय घेतला आहे.

आता रेल्वे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा फायदा पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांना होणार आहे.

काय आहे प्रकार ?

मध्य आणि पश्चिम मार्गावरील प्रवाशांना या वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी रेल्वे स्थानकांवर हेल्थ चेकअप एटीएम मशीन बसवण्यात येणार आहे.

अवघ्या ६० रुपयांमध्ये तब्बल १६ प्रकारच्या चाचण्या करता येणार आहेत, त्याही अवघ्या १० मिनिटांमध्ये.

‘या’ स्थानकावर मिळणार सुविधा

पश्चिम रेल्वेच्या एकूण ५ तर मध्य रेल्वेच्या ३ स्थानकांवर ही सुविधा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, अंधेरी आणि बोरीवली या स्थानकांवर वैद्यकीय सुविधा मिळणार आहे.

तर मध्य रेल्वेच्या कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवर वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

रक्तदाब (ब्लडप्रेशर), फॅट, हाडं, वजन, मेटाबॉलिक एज, बॉडी मास इंडेक्शन यासर्वांची तपासणी केली जाणार आहे.

तसेच विविध आजारांवर सल्ला देखील देण्यात येणार आहे.

रेल्वे प्रवाशांना या हेल्थ चेकअप एटीएम मशीनद्वारे त्यांच वजन , शरीराचं तापमान, ऑक्सीजनची मात्रा जाणून घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *