मुंबईतील लोकलबाबत २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार?

मुंबई : मुंबईत १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांत रुग्णसंख्येत पुन्हा वाढ दिसून येत आहे. मुंबईत जानेवारी महिन्यात दिवसाला सरासरी ३०० ते ३५० पर्यंत रुग्णांची नोंद होत होती. हा आकडा आता ६५० वर पोहोचला आहे. परिणामी, राज्यात अन्य ठिकाणी शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतरही मुंबई महापालिकेमार्फत सावध पावले टाकली जात आहेत. मुंबईच्या लोकलच्या निरीक्षणासाठी १५ दिवसांचा कालावधी ठेवला होता. हा कालावधी २१ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत असल्याने महापालिका रुग्णसंख्येचा आढावा घेणार आहे.