Tue. Oct 27th, 2020

जिलेबी फाफड्याला राष्ट्रीय खाद्य घोषित करा – जितेंद्र आव्हाड

तुम्ही जिलेबी फाफडा खाता. जिलेबी-फाफड्याला राष्ट्रीय खाद्य जाहीर करा, असं आव्हानच आव्हाडांनी किरीट सोमय्या यांना दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत आदिवासी पाड्यावर जेवतानाचा फोटो ट्विट केला होता. शहापूर तालुक्यातील दोऱ्याचा पाडा या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी भेट घेतली होती. यावेळेस या दोन्ही नेत्यांना आदिवासी मावशीने मांसाहारी जेवन खाऊ घातलं.

शरद पवारांसोबत जेवतानाचा फोटो जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला होता.

‘या नेत्याला काय म्हणावे … कुडाची झोपडी .. आदिवासी मावशी ने केलेला स्वयपाक .. तांदळाची भाकरी … भाजलेला कोंबड्याच्या रस्सा … कनटोरल्याची भाजी … आणि साहेब जेवता आहेत … संस्मरणीय दिवस .. 30/1/2020 तालुका शहापूर दोर्याचा पाडा’ अशी कॅपशन या फोटोला दिली.

दरम्यान हा फोटो ट्विट केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही ट्विट करत डिवचण्याचा प्रयत्न केला.

याला प्रत्युतर म्हणून आव्हाड यांनी सोमय्या यांच्या ट्विटला रिप्लाय दिला.

आव्हाडांनी काय दिला रिप्लाय ?

दादा, आदिवासी आजही चिकन खातात. आम्ही अनेक वर्षांपासून चिकन खातो. पाहुण्यांच्या आवडीचं जेवण आदिवासी देऊ शकत नाहीत, इतकं त्यांना तुम्ही गरिब समजता का ? आदिवासींच्या गरिबीची थट्टा उडवू नका, असं आव्हाड रिप्लाय देताना म्हणाले.

तुम्ही जिलेबी-फाफडा खाता, या जिलेबी फाफड्याला राष्ट्रीय खाद्य जाहीर करा, असं आव्हानच आव्हाडांनी सोमय्यांना दिलं.

दरम्यान याआधीही शिवभोजन थाळी खाताना सोबत असलेल्या पाण्याच्या बॉटलमुळे ट्रोल करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *