Fri. Dec 3rd, 2021

रत्नागिरीत कोरोना रुग्ण बाधितांच्या संख्येत घट

रत्नागिरी : दिवसभरात ४२३ कोरोना बाधित झाले असून अ‍ॅण्टीजेनच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ४ हजार ६२३ जणांच्या चाचण्या झाल्या. त्यातील ४ हजार २२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून बाधितांमध्ये १७९ आरटीपीसीआरमधील तर अ‍ॅण्टीजेनमधील १८५ जणं आहेत. शासनाने अ‍ॅण्टीजेनपेक्षा आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत.

जिल्ह्यात १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात चिपळूण १, खेड १, लांजा १, राजापूर ३, रत्नागिरी ७, संगमेश्‍वर ३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकुण १ हजार ८०५ कोरोना बाधित झाले असून तसेच मृत्यूदर २.८६ टक्के आहे. दिवसभरात ३८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ६ हजार १०२ जणं विविध केंद्रांवर उपचार घेत असून त्यातील २ हजार ६९६ जणं गृहविलगीकरणात तर २ हजार ८५० जणं संस्थात्मक विलगीकरणात आहेत. ५५६ जणांचे अहवाल अजूनही पोर्टलवर अपडेट केलेले नाहीत.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्यामुळे शुक्रवारी रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला.कोरोनासाठी आरटीपीसीआरची चाचणी अत्यंत महत्त्वाची असून याच चाचणीच्या आधारे भविष्यात जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर ठरवण्यात येणार आहे. सध्या दोन्ही चाचण्या मिळून हा दर ७.८७ टक्के आहे. बाधितांमध्ये मंडणगड ५, दापोली १३, गुहागर २८, चिपळूण ९४,खेड २३ संगमेश्‍वर ३७, रत्नागिरी १११, लांजा १५, राजापूर ३८ बाधित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *