Sat. Oct 24th, 2020

आठ दिवसांपासून घसरत आहेत कांद्याचे दर

मध्यंतरी कांद्याचे दर वाढल्यानं केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. कांद्याचे दर हे जवळपास 12 हजार रुपये क्विंटल वर येऊन ठेपले होते. त्यामुळेच कांदा साठवणूक आणि कांदा निर्यातवर बंदी आणावी लागली होती. मात्र गेल्या आठ दिवसांपासून कांद्याचे दर (prices of onions) घसरत आहे.

कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरत असल्याचे कांदा व्यापाऱ्यांकडून (onions traders) सांगण्यात येतंय.

कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठवावी यासाठी नाशिकचे खासदार पुढे सरसावले आहेत.

कांदा निर्यात उठविली जावी यासाठी नाशिकचे भाजपाचे खासदार भारती पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे याबाबत कांद्यावरची बंदी उठवावी यासाठी मागणी केली आहे.

दरम्यान कांद्याचे दर घसरत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे याबाबत मी स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांकडे या बंदीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे.

कांद्याचे दर हे दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कांद्याच्या देशाच्या एकूण उत्पादनांपैकी महाराष्ट्रात मध्ये जवळ जवळ 33 टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते, ज्यात अतिशय उत्कृष्ट प्रतीच्या कांद्याचे उत्पादन हे नाशिक मध्ये घेतले जाते.

परंतु कांद्यावर निर्यात बंदी असल्यानं कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होत असून कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी यासाठी पियुष गोयल यांच्याकडे नाशिकच्या खासदारांनी विनंती केली आहे.

महाराष्ट्रासह नाशिकच्या देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणारे नुकसान कसे टाळता येईल यासाठी हा मुद्दा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे नाशिकच्या खासदारांनी मांडला असून लवकरच कांद्या निर्याती बाबत तोडगा काढला जाऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा विश्वास खासदार भारती पवार यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *