Fri. Sep 24th, 2021

JNU मध्ये दीपिका पदुकोण, social media वर गदारोळ

JNU मधील हल्ल्याचे पडसाद सर्व स्तरांतून उमटू लागलाय. विविध बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींकडूनही या हल्ल्याचा निषेध होतोय. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोण (Deepika Padukone)हिने JNU मध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलाय. तिच्यासोबत JNUच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारदेखील तेथे पोहोचला.

दीपिका ‘छपाक’ (Chhapaak) सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिल्लीमध्ये आली होती. त्यावेळी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना दीपिकाने JNU मधील विद्यार्थ्यांच्या हिमतीला दाद दिली होती. तसंच हे विद्यार्थी स्वतःला व्यक्त करण्यासाठी घाबरत नाही. त्यामुळे त्यांचा विचार कसाही असला, तरी मला त्याचा आनंद आहे.”

दीपिका JNU मध्ये 10 मिनिटं होती. इतक्या मोठ्या अभिनेत्रीने थेट विद्यार्थी चळवळीत जाऊन उपस्थिती लावणं हा दुर्मीळ प्रसंग होता. तिच्या पाठिंब्याबद्दल विद्यार्थ्यांनी तिचे आभार व्यक्त केले.  

मात्र दीपिकाच्या JNU मधील सहभागामुळे तिच्या धाडसाचं कौतूकही होतंय, तर दुसरीकडे तिच्यावर टीकेची झोडउठली आहे. भाजपचे (BJP) दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदरपाल बग्गा यांनी दीपिकाच्या ‘छपाक’ सिनेमावर टाकण्याचं आवाहन केलं. Twitter वर एकीकडे #BoycottChhapak ट्रेंडिंगमध्ये आहे, तर दुसरीकडे #SupportDeepika trending मध्ये आहे.

काही जणांनी हा तिचा सिनेमाच्या प्रमोशनसाठी पब्लिसिटी स्टंट आहे असं म्हणत सिनेमावरच बहिष्कार घालण्याची भाषा करू लागले आहेत. कितीतरी जणांनी ‘छपाक’ऐवजी ‘तान्हाजी’ सिनेमा पाहाणार असल्याचं ट्विटरवर घोषित केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *