या 13 गेम्समुळे होऊ शकतो डेटा हॅक

सध्याच्या धावपळीच्या युगात आई-वडिल दोघांनाही कामासाठी बाहेर राहावं लागत असल्यानं मुलांचा वावर हा घरातच मर्यादीत राहिला आहे. याचा परिणाम साहजिकच त्यांच्या खेळण्यावरही होतो. कुठे खेळायचं ?
मैदानावरचे खेळ ( आऊटडोअर गेम्स ) मुलांना नेहमीच आवडतात. शहरीकरण आणि औद्योगिक विकासामुळे त्यांच्या खेळाच्या जागा कमी होत आहेत. तसेच सुरक्षेच्या कारणामुळेही आई-वडिल त्यांना अनेकदा बाहेर खेळू देत नाहीत. त्यामुळे मुलांचा स्क्रीन गेम्सकडे कल वाढू लागलाय.
मुलांच्या हातात मोबाईल दिल्यावर मुलं स्वत:हून आवडते गेम्स डाऊनलोड करतात. परंतू हेच काही गेम्स ठरू शकतात धोकादायक! याचीच खबरदारी बाळगत सायबर सुरक्षेसाठी काम करणाऱ्या ESET च्या लुकास स्टैफैंको या संशोधकाने ताबडतोब तुमच्या मोबाईम मधले 13 गेम्स अॅप्स डिलीट करण्याचं ट्वीट करत आव्हान केले आहे.
या ट्विटमध्ये त्याने असं म्हटलंय की, तुमच्या मोबाइलच्या प्लेस्टोअरमध्ये असे 13 गेम्स अॅप्स आहेत, ज्यात अतिशय धोकादायक व्हायरस लपलेला आहे. त्याचा डोळा तुमच्या मोबाइलधील तुमच्या व्यक्तिगत माहितीवर असल्याचं म्हटलं आहे.
इंटरनेट विश्र्वात सर्वाधीक धोका हा व्हायरसचा आहे. हे व्हायरस तुमचा मोबाईल, कंप्युटर किंवा अन्य डिव्हाईसमध्ये शिरून तो तमुची व्यक्तीगत माहिती चोरी करतो.
आणि जर का त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, तर नक्कीच तुमची व्यक्तीगत माहिती चोरी होऊ शकते. एवढंच नव्हे तर तुमच्या आर्थिक व्यवहारांशी निगडीत माहितीलासुद्धा (बँकेचे डिटेल्स) धोका निर्माण होऊ शकतो. जर तुमच्या मोबाइलमध्ये हे 13 गेम्स अॅप्स असतील, तर ते ताबडतोब डिलीट करा असं लुकासने म्हटलंय.
हे आहेत ते गेम्स –
- ट्रक कार्गो सिम्यूलेटर (Truck Cargo Simulator),
- एक्सट्रीम कार ड्राइविंग (Extreme car Driving),
- सिटी ट्रैफिक मोटो रेस (City Traffic Moto race),
- मोटो क्रॉस एक्सट्रीम (Moto Cross Extreme),
- हाइपर कार ड्राइविंग (Hyper Car driving),
- एक्स्ट्रीम कार ड्राइविंग (Extreme Car Driving),
- फायरफाइटर,
- कार ड्राइविंग सिम्यूलेटर,
- एक्स्ट्रीम स्पोर्ट कार (Extreme Sport car),
- SUV 4X4 ड्राइविंग सिम्यूलेटर,
- लग्जरी कार पार्किंग,
- लग्जरी कार्स SUV टेस्ट,
- SUV सिटी क्लाइम्ब पार्किंग