Sat. Mar 6th, 2021

दिल्लीतील बॉम्बस्फोटामागे जैश उल हिंद; संघटनेचा हात

दिल्लीतील इस्रायली दूतावास असलेल्या परिसरात शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण दिल्लीत भीतीचं वातारण निर्माण झालं आहे. इस्रायली दूतावाससमोर झालेल्या बॉम्बस्फोटाची जैश उल हिंद या संघटनेनं जबाबदारी घेतली असून या घटनेचा तपास सुरू आहे. यंत्रणांकडून जैश उल हिंदकडून करण्यात आलेल्या दाव्याची पडताळणी केली जात आहे. टेलिग्राम चॅटमधून ही माहिती पुढे आली असून, तपास यंत्रणांकडून त्याची पडताळण केली जात आहे. या आधी एक चिठ्ठी यंत्रणांना घटनास्थळी सापडली होती. त्यातून हा दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळाले होते.

अधिकाऱ्यांनी परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कॅब दिसून आली आहे. या कॅबने दोन लोकांना घटनास्थळी सोडलं होतं. त्यानंतर कॅब निघून गेल्याचं दिसत आहे. कॅबमधून उतरल्यानंतर दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, तिथे पायी जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. शिवाय सीसीटीव्ही ही माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला आहे. या दोन्ही व्यक्तींची स्केच तयार केली जात असून बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी पोलिसांना बरंच साहित्य मिळालं आहे. यामध्ये एक लिफाफा सापडला आहे. लिफाफ्यामध्ये एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर आहे.’ असं लिहलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या चिठ्ठीत इराण लष्कराचे कमांडर कासीम सुलेमानी आणि अण्वस्त्र शास्त्रज्ञ मोहसीन फखरजादेह यांच्या नावांचा शहीद असा उल्लेख करण्यात आलेला आहे. दोघांचीही गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती. बगदाद विमानतळाजवळ कासीम सुलेमानी यांची ड्रोन हल्ला करून हत्या करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *