Delhi Election 2020 : सत्तेत आल्यास CAA ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार, काँग्रेसचा वचननामा

राज्यासह देशभरात सीएए विरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत. दिल्लीत काँग्रेसचं सरकार आल्यास सीएएला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार, असं आश्वासन काँग्रेसच्या वतीने देण्यात आलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज रविवारी काँग्रेसने दिल्लीकरांसाठी वचननामा जाहीर केला. या वचननाम्यात हे आश्वासन देण्यात आलं आहे.
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोपडा, पक्ष नेता आनंद शर्मा आणि अजय माकन यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. या वचननाम्यात दिल्लीकरांना अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत.
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. तर ११ फेब्रुलारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमध्ये सध्या आम आदमी पक्षाची सत्ता आहे.
पक्षीय बलाबल
एकूण जागा : 70
आम आदमी पार्टी : 67
काँग्रेस : 03
भाजप : 00
दिल्लीत एकूण २६८९ ठिकाणी १३ हजार ७५० मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
दिल्लीत एकूण १ कोटी ४६ लाख मतदार आहेत.
विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला संपत आहे.