Thu. Jan 20th, 2022

Delhi Election 2020 : वीज सवलतीसह अनेक मोठ्या घोषणा, दिल्लीकरांसाठी काँग्रेसचा वचननामा

भाजपच्या पाठोपाठ काँग्रेसनेही वचननाम्याची घोषणा केली आहे. या वचननाम्यात काँग्रेसने दिल्लीकरांना अनेक आश्वासन दिली आहेत. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोपडा, पक्ष नेता आनंद शर्मा आणि अजय माकन यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.

वचननाम्यातील आश्वासनं

300 यूनिट पर्यंत मोफत वीज

300-400 यूनिट पर्यंत वीजवापरावर 50% सवलत

400-500 यूनिट पर्यंत वीजवापरावर 30% सवलत

500-600 यूनिट पर्यंत वीजवापरावर 25% सवलत

20 हजार लीटर पाणी मोफत. कमी पाणी वापरल्यास ३० पैसे प्रतिलीटर या दराने कॅशबॅक देणार.

शासकीय नोकरीत महिलांना ३३ टक्के आरक्षण

शीला पेंशन योजनेनुसार तृतीयपंथ्यांना दरमहा ५ हजार मिळणार

युवा स्वाभिमान योजनेनुसार पदवीधर बेरोजगारांना दरमहा ५ हजार तर पदव्यूतर असलेल्या बेरोजगारांना ७ हजार ५०० रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे.

महाविकास आघाडी सारखंच दिल्लीतही १०० इंदिरा कॅंटिन केंद्र सुरु करणार.  महिलांद्वारे हे केंद्र चालवलं जाणार. या केंद्रावर १५ रुपयांमध्ये जेवण उपलब्ध होणार आहे.

काँग्रेस सत्तेत आल्यास सीएए नागरिकता संशोधन अधिनियमला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं आश्वसन काँग्रेसने दिलं आहे.

काँग्रेस सत्तेत आल्यास दिल्लीतील घरासांठी ५ वर्षात ३५ कोटी खर्च करुन विकसित करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.  

दिल्लीत एम्स हॉस्पीटलसारखे ५ हॉस्पीटल बनवणार.

मुलींना पीएचडी पर्यंतच शिक्षण मोफत देणार.

सर्व अनधिकृत वसाहती अधिकृत करणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *