Wed. Jan 19th, 2022

Delhi Election Result 2020 : दिल्लीत काँग्रेसच्या ‘हाती’ भोपळाच

दिल्ली विधानसभा निवडणुकींचे निकाल स्पष्ट झाले आहे. दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला एकहाती सत्ता दिली आहे. आपला दिल्लीत ‘आप’ली सत्ता राखण्यास यश आले आहे.

मात्र काँग्रेसला या वेळेस ही विशेष कामगिरी करता आली नाही.

काँग्रेसला यंदाही दिल्लीत खातं उघडता आलेलं नाही. काँग्रेसच्या ‘हाती’ या निवडणुकीतदेखील भोपळाच मिळाला आहे.

या निकालावरुन दिल्लीकरांनी काँग्रेसला नाकारल्याचं सिद्ध झालं आहे. या निवडणुकीसाठी राहुल गांधींनी अवघ्या २ प्रचारसभा घेतल्या होत्या.

काँग्रेसला 2015 च्या निवडणुकीत एकूण ९.७ टक्के इतकं मतदान झालं होतं.

दिल्लीत ३ वेळा सत्ताधारी असलेल्या पक्षाला एकही जागा न मिळणे, हे दुर्देव असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय.

ताज्या आकडेवारीनुसार पक्षीय बलाबल

आम आदमी पार्टी : ६२

भारतीय जनता पार्टी : ०८

काँग्रेस : 00

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *