‘त्या’ एका कॉलनंतर दिल्ली उच्च न्यायालयात हायअलर्ट
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालय परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला. पोलिसांना हायकोर्ट परिसरात बॉम्ब असल्याचा निनावी कॉल आल्यानंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली.
दिल्ली पोलिसांना सकाळी अज्ञाताकडून उच्च न्यायालय परिसरात बॉम्ब असल्याचा कॉल आला. हायकोर्ट उडवून देण्याची धमकी या कॉलद्वारे देण्यात आली होती. या कॉलनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुरक्षा वाढवली. स्वॉट टीम, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोध पथकही घटनास्थळी दाखल झालं.