Fri. Nov 27th, 2020

दिल्लीकर महिलांसाठी बस आणि मेट्रोचा प्रवास फ्री – अरविंद केजरीवाल

दिल्लीकर महिलांसाठी आनंदाची बातमी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी बस आणि मेट्रोचा प्रवास मोफत असल्याची घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली परिवाहन मंडळाच्या बस, क्लस्टर बसेस आणि मेट्रो ट्रेनचा प्रवास महिलांसाठी मोफत असल्याचे सांगितले आहे. तसेच शहरात 70 हजार सीसीटीव्ही लावले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दिल्लीकर महिलांसाठी आनंदाची बातमी –

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

दिल्ली परिवाहन मंडळाच्या बस, क्लस्टर बसेस आणि मेट्रो ट्रेनचा प्रवास महिलांसाठी मोफत असल्याची मोठी घोषणा केली आहे.

त्याचबरोबर वाढीव तिकिट दराची चिंता करू नका आणि आपण आपल्या पर्याय निवडून प्रवास करू शकतात.

तसेच शहरात 70 हजार सीसीटीव्ही लावले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच ज्या महिलांना तिकीटचे दर परवडतात त्यांनी याचा लाभ घेऊ नये असे आवाहन त्यांनी महिलांना केले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *