Tue. Jul 7th, 2020

‘तेजस एक्स्प्रेस’ला उशीर झाल्यास मिळणार नुकसानभरपाई !

लखनौ-दिल्ली तेजस एक्सप्रेस या देशातील पहिल्या खासगी रेल्वेला जर एक तासाहून अधिक विलंब झाला तर प्रवाशांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे. ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’कडून (IRCTC) ऑक्टोबर महिन्यापासून तेजस ट्रेन सुरू होणार आहे. ही रेल्वे जर तासभर उशीरा आली तर प्रवाशांना त्याची  नुकसानभरपाई (पेआऊट्स) देण्याचा विचार करीत आहे.

भारतीय रेल्वे आता आपल्या सेवेचा चेहरा बदलण्याच्या प्रयत्नात आहे.

यानुसार दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस आणि मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस या रेल्वेंना खासगी स्वरुपात चालवले जाणार आहे.

या गाडयांमध्ये प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोई आणि आरामदायी व्यवस्था असेल.

पहिली ट्रेन दिल्ली ते लखनौ दरम्यान धावणार आहे.

तेजस एक्स्प्रेसचं भाडं याच मार्गावरून धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसएवढंच असेल.

पण यात अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. दुसरी तेजस नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे.

याशिवाय दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेसमध्ये जास्तीचं जेवण देण्याचाही विचार आहे.

याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

पण ही रेल्वे लखनौत पोहोचते तेव्हा दुसऱ्यादा जेवणाची वेळ झालेली असते.

त्यामुळे स्टेशनवर रेल्वे आल्यानंतर स्नॅक्स किंवा अन्य काही वितरित करण्याच्या विचारात आहे.

तसंच तेजस एक्स्प्रेसमध्ये चहा कॉफीच्या व्हेंडिंग मशीन्स, प्रवाशांनी मागणी केल्यास पाण्याव्यतिरिक्त पेय, विमानात असतात तशा टॉयलेटची सेवा अर्थात प्रत्येक डब्यात टॉयलेट ज्येष्ठ नागरिकांसाठी भाड्यात सवलत, तिकीटासोबत 50 लाख रुपयांचं इन्श्युरन्स कव्हर अशा सेवा सुरु करण्याचा IRCTC चा विचार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *