Sun. Apr 18th, 2021

‘पावती फाडलीत, तर मी…’ तरुणीचा वाहतूक पोलिसांपुढे भररस्त्यात धिंगाणा

एका तरुणीने वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहतुक पोलिसांनी तिच्याकडून दंड मागितला असता त्यांना तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोटार वाहतूक नियमात बदल झाल्यामुळे चालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अनेकदा वाहतुक पोलीस जबरदस्ती, जास्त पैसे घेण्याचे आणि दबाव टाकण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मात्र दिल्लीत या उलट घडलं आहे. एका तरुणीने वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहतुक पोलिसाने दंड आकारत असल्यामुळे आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

दिल्लीतील वाहतुक पोलिसांनी तरुणीकडे गाडीचे कागदपत्र मागितल्यानंतर तिने त्यांना उलटसुलट उत्तर देण्यास सुरुवात केली.

त्यानंतर तरुणीने भर रस्त्यात रडायला सुरुवात करत रस्त्यात गोंधळ घातला.

मात्र वाहतुक पोलीस नियमाप्रमाणे पावती फाडत असल्यामुळे शेवटी तरुणीने आत्महत्येची धमकी दिली.

गाडी वेगाने चालवणे, हेल्मेटचा वापर न करणे, नंबर प्लेट तुटलेली या सर्व कारणाने वाहतुक पोलिसांनी तरुणीकडून दंड आकारण्यासाठी पावती फाडली.

मात्र कोणत्याही कारणासाठी तुम्ही माझ्याकडून आकारु शकत नाही. मी इथे आत्महत्या करेन आणि त्याला जबाबदार तुम्ही असाल’ अशी धमकी तरुणीने पोलिसांना दिली.

वाहतुक पोलिसांनी तरुणीचे एक न ऐकता तरुणीने आपली चूक मान्य केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीकडून कोणताही दंड न घेता तिला सोडून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *