Fri. Jan 28th, 2022

राज्यात डेंग्यूचं तांडव

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात गेल्या सहा दिवसात तीन बालकांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे यात बालकांना सर्वाधिक डेंग्यूने ग्रासलं आहे. तिवसा येथील देवांश वाट वय १८, अजय रेवतकर वय ८ वर्ष व कृष्णा देशमुख वय १३ वर्ष या तीन बालकांचा सहा दिवसात डेंग्यूने मृत्यू झाला आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालयात महिनाभरात ४० रुग्ण डेंग्यू सदृश्य आढळून आले आहेत. अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरात २० दिवसापासून डेंग्यूचे मोठं तांडव सुरू आहे.या ठिकाणी २५० रुग्ण डेंग्यू सदृश्य आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. येथे दहा डेंग्यू टेस्टमध्ये सात डेंग्यू पॉझिटिव्ह निघत असल्याने आता कोरोना नंतर हे नवीन संकट अमरावतीत निर्माण झाले आहे.

दरम्यान , मुंबईत डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे पालिकेने आता या दोन्ही साथीच्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्यांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याच्या मोहिमेला वेग दिला आहे. मुंबईत ठिकठिकाणी मोठय़ा संख्येने या डासांच्या अळ्यांची उत्पत्तीस्थाने आढळू लागली असून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या शोधमोहिमेत आतापर्यंत ३९,४८१ ठिकाणी डेंग्यूच्या, तर ७,९२२ ठिकाणी हिवतापाच्या वाहक डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *