Thu. Feb 25th, 2021

हॉर्न वाजवल्यामुळे दंतचिकित्सकाला मारहाण; घटना CCTVमध्ये कैद

रस्त्यावर गाडी चालवताना हॉर्न वाजवला नाही म्हणून भांडणं होताना अनेकदा पाहिलं आहे. मात्र पिंपरीमध्ये एका व्यक्तीने चक्क हॉर्न वाजवल्यामुळे मारहाण केल्याची घटना घडली आहे. एका व्यक्तीने दंतचिकित्सकाला हॉर्न वाजवल्यामुळे जबर मारहाण केली आहे. आदित्य पतकराव असे जखमी चिकित्सकाचे नाव असून मनोज मोरया असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेबाबत सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

पिंपरीमधील पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटीजवळ एका दंतचिकित्सकाने गाडीचा हॉर्न वाजवल्यामुळे मारहाण केल्याची घटना घडली.

आदित्य पतकराव असे जखमी चिकित्सकाचे नाव असून मनोज मोरया असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून दोघेही एकाच इमारतीत राहतात.

सोमवारी सकाळी इमारतीच्या गेटजवळ मनोज यांचा वॉचमनसोबत वाद सुरू होता.

त्याचदरम्यान दंतचिकित्सक आदित्य यांनी हॉर्न वाजवला.

राग अनावर झाल्यामुळे मनोज यांनी आदित्य यांच्या कानशिलात लगावली.

हा सर्व प्रकार इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून कानाचा पडद्याला छेद पडल्याचा आरोप दंतचिकित्सकाने लावला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *