उपमुख्यमंत्री अजित पवार करोनामुक्त
अजित पवार हे करोनामुक्त…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे करोनामुक्त झाले आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला असल्याचं सुप्रिया यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोरोनाच्या काळात अजित पवार सतत दौऱ्यावर होते आणि विविध ठिकाणी भेटी देत होते शिवाय त्यांनी अतिवृष्टीच्या काळात फटका बसलेल्या भागाची पाहणी केली होती. मंत्रालयातील बैठकी दरम्यान त्यांना थकवा जाणवत होता. त्यानंतर त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती मात्र आता त्यांची प्रकृती ही उत्तम आहे.