Sat. Feb 27th, 2021

Balakot Airstrike : बालाकोट हल्यावेळी जैशच्या तळावर 263 दहशतवादी?

भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानाने बालकोटमधील जैश-ए-महोम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केली. यानंतर या एअर स्ट्राइक मध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले. याचा आकडा समोर आला नव्हता. हल्याच्या 5 दिवस आधी जैशच्या तळावर  263 दहशतवादी जमले होते . भारताने 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केला. जैशमध्ये भरती होण्यासाठी आलेले हे सर्व दहशतवादी आणि त्यांच्या ट्रेनर्सकडे असलेले मोबाइल फोन चालू होते. भारताच्या नॅशनल टेक्निकल रिसर्च संस्थेकडून (NTRO ) या सर्व मोबाइल्सच्या  सिग्नलवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते.अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा

भारताच्या फायटर विमानांच्या हल्ल्यानंतर हे सर्व सिग्नल बंद झाले,असं गुप्तचर खात्यातील सूत्रांनी म्हटलं .

मृतांच्या आकड्याबद्धल भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

पण मोबाइल सिग्नलच्या आधारेच 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांकडून केला आहे.

हल्ल्याच्या वेळी बालकोटमधील जैशच्या तळावर 18 सिनियर कमांडर्सकडे अफगाणिस्तानात अमेरिकेविरूद्ध युद्ध लढण्याचा अनुभव होता.

भारताच्या हल्ल्यात हे सर्व ठार झाले असतील, तर जैशसाठी तो मोठा दणका आहे.

मुफ्ती उमर, मौलाना जावेद, मैलाना अस्लम, मौलाना अजमल,मौलाना झुबेर,मौलाना अब्दुल गफूर काश्मिरी, मौलान कासिम आणि मौलान जुनैद हे दहशतवादी तिथे होते.

हे सर्वजण जैशचा म्होरक्या मसूद अझहरचे निकटवर्तीय होते.या तळावर 83 दहशतवादी दौरा-ए-आम म्हणजे दहशतवादाच्या प्राथमिक शिक्षणासाठी आले होते.

91 दौरा-ए-खास आणि 25 दहशतवाद्यांच्या जेवणासाठी आचारी, सुरक्षा रक्षकही त्या तळावर होते.अशी माहिती गुप्तचर यंत्रंणांनी दिली आहे .

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *