बंदी असतानाही ‘येथे’ झाली रेड्यांची झुंज

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आवडीची स्पर्धा म्हणजे रेड्यांची झुंज. अलीकडच्या काळात न्यायालयाने पशु हिंसा कायद्यांतर्गत या खेळावर बंदी आणली आहे.
तरी देखील अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर या गावात रेड्यांची झुंज भरते. यावर्षी देखील रेड्याची दंगल भरविण्यात आली.
पिंगळाई नदीच्या पात्रात रेड्यांची झुंज रंगली. ३० हुन अधिक नामवंत रेडे याठिकाणी दाखल झाले होते. दरम्यान रेड्यांची झुंज चांगलीच रंगली यावेळी जिल्हाभरातून लोकांनी गर्दी केली होती.
न्यायालयाची बंदी असताना रेड्यांची झुंज भरविणे हा कायद्याने गुन्हा आहे. आता प्रशासन यावर कोणती भूमिका घेतं. याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.