Fri. Apr 16th, 2021

, ‘पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही,’ – मुख्यमंत्री

‘दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही त्यांची माजोरी व मुजोरी जनतेला माहीत असल्याने मतदार त्यांना थारा देणार नाहीत,

‘दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही त्यांची माजोरी व मुजोरी जनतेला माहीत असल्याने मतदार त्यांना थारा देणार नाहीत, असं सांगत, ‘पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केलं. ते मराठवाड्यातील पाथर्डी तालुक्यात बोलत होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

‘कोणत्याही यात्रेचे एक दैवत असते. मी काढलेल्या यात्रेचे दैवत हे राज्यातील जनता असून आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी व जनतेशी संवाद साधण्यासाठी मी महाजानदेश यात्रा काढलेली आहे. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दोन्ही काँग्रेसही यावेळी यात्रा काढत आहेत या यात्रेकडे मात्र जनतेने पाठ फिरवली आहे,’ असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केलं. ते मराठवाड्यातील पाथर्डी तालुक्यात बोलत होते.

ताजनापूर येथील योजनेसाठी राज्य सरकार दीडशे कोटी रुपये देणार असून गोदावरी प्रकल्प योजनेच्या माध्यमातून मराठवाडा व पाथर्डी तालुक्यात असलेल्या अनेक गावात पाणी देऊन या ठिकाणचा पाणीप्रश्न सोडवला जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *