Wed. Jan 19th, 2022

कोल्हापूरसह महाराष्ट्रातील पुराचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 22 पथके कार्यरत आहेत.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 22 पथके कार्यरत आहेत. मुख्य सचिवांनी केंद्रीय सुरक्षा सचिवांशी संपर्क साधून डोनिअर विमानाच्या माध्यमातून पुरग्रस्तभागातील नागरिकांना स्थलांतर करण्याची मागणी केली. त्यानुसार आता कार्यवाही सुरू असल्याचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूर मधील 204 गावांना पूराचा फटका बसला आहे. प्रशासनामार्फत सध्या 11 हजार नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. आता नौदलाचे बचाव पथक देखील कार्यरत आहे.

कोल्हापूर पुराचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

सांगली जिल्ह्यात सांगली, पलूस, वाळवा तालुक्यात पूराचा फटका बसला आहे. सुमारे 53 हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील नागरिकांना पुरपरिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. पंढरपूर येथील सुमारे 2000 नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे.

ज्या भागात पुरामुळे लोक अडकले आहेत त्यांना सुरक्षीत ठिकाणी हलवावे आले त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. पुणे जिल्ह्यात शहरासह 64 गावं पूराने प्रभावित झाली असून सुमारे 3343 लोकांना मदत करण्यात आली आहे. पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये गहू आणि तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणं 100 टक्के भरली आहेत.

रायगड जिल्ह्यात 8 तालुके बाधीत असून सरासरीच्या 105 टक्के पाऊस झाला आहे. सुमारे 3000 लोकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिलह्यातील 38 धरणं 100 टक्के भरली आहेत. पुरामुळे 13 गावे बाधीत झाली आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या 50 वर्षांतला सर्वाधिक विसर्ग सोडण्यात आला असून सर्व धरण 80 टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. ठाणे जिल्ह्यात 13 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

यावेळी सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *