Wed. Dec 1st, 2021

बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद; विरोधकांवर जोरदार टीका

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात महाजनादेश यात्रा काढत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील महाजनादेश यात्रा यशस्वी पार पडल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेत महाजनादेश यात्रेबद्दल सांगितले आहे. तसेच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत आपल्या कामाचा पाढा वाचला.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?

विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा काढली.

ही महाजनादेश यात्रा उत्तर महाराष्ट्रात यशस्वीरित्या पार पडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यामध्ये 60 मतदारसंघात तर आतापर्यंत 1641 किमी प्रवास केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांनी जनतेशी संवाद साधला नसून यात्रेमध्ये लोकांचा सहभागच नसल्याचे म्हटलं आहे.

मराठवाड्यातील दुष्काळ दूर करणार.

दुष्काळावर शाश्वत उपयोजना झाले पाहिजे तर दुष्काळाबबात योग्य ते नियोजन करणार असल्याचे म्हटलं.

बीडच्या वॉटरग्रीडला मान्यता मिळाली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

4 हजार 800 कोटींचा मोठा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कृष्णाचं पाणी मराठवाड्याला देणार आहेत.

बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवारचं विशेष काम सुरू आहे.

बीड जिल्ह्याला अनुक्रमी अनुदान मिळालं.

कृत्रिम पाऊस हा तज्ञ्ज्ञांच्या देखरेखेखाली घेण्यात आला.

पत्रकारांवर असलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी एका पत्रकाराने केली.

त्यावर तपसाणी करू, खोट्या केसेसची शाहनिशा करू.

वाहन उद्योगात मंदीची लाट दिसत असून लवकरच तोडगा काढणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *