Sat. Oct 24th, 2020

भिवंडी हा छोटा भारत – मुख्यमंत्री

जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी

 

भिवंडी हा छोटा भारत असून तो आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज बनला पाहिजे. आज भिवंडीला अस्वच्छ शहर म्हणत जे नाकं मुरडतात त्यांना भविष्यात भिवंडी हेच

वास्तव करण्यायोग्य शहर वाटले पाहिजे.

 

असे विकासाचे मिनी मॉडेल आम्ही येथे साकारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. निवडणूकीपूर्वीच आम्ही भिवंडीला 34 योजनांकरिता हजारो कोटी

रुपये दिल आहेत.

 

शहरात सुविधा निर्माण करण्यासाठी लागेल तेवढा निधी देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली. कोणत्याही जाती-धर्माची व्यक्ती गरीब, बेघर असेल कच्च्या घरात राहत

असेल तर त्यास पंतप्रधानमंत्री योजनेंतर्गत घर देण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *