Mon. Jul 13th, 2020

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर तुकाराम मुंढेंवरील अविश्वास प्रस्ताव मागे

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध सत्ताधारी भाजपनं अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती.

मात्र तुकाराम मुंढे यांना नाशिकमधून नागरिकांचा पाठिंबा वाढू लागला होता. त्यामुळे नाशिकरांनी मुंडे यांच्या समर्थनार्थ walk for commissioner रॅली आज आयोजित केली होती.

या रॅलीसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आम्ही रॅली काढणारच अशी भूमिका काही संघटना आणि नागरिकांनी घेतली होती.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढेंवर विश्वास दाखवत त्यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिले होते.

मुंख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर भाजपचे नेते आणि महापौर यांनाी  हा अविश्वास ठराव अखेर मागे घेतला आहे. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *