Tue. May 11th, 2021

कटप्पानं बाहुबलीला का मारलं? जयंत पाटलांनाही बाहुबली पार्ट 2 दाखवण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कटप्पानं बाहुबलीला का मारलं याचं उत्तर अवघा देश शोधत होता. अगदी विधिमंडळातही हा मुद्दा गाजला.

 

विरोधकांची संघर्ष यात्रा थेट जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या खडसेंच्या दारात दाखल झाली होती. त्यानंतर अनेक तर्क वितर्क लढवले गेले.

 

अधिवेशनात कटप्पानं बाहुबलीला का मारलं याचं उत्तर मिळवण्यासाठीच आम्ही एकनाथ खडसेंच्या घरी गेलो होती अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी मारली.

 

तर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या प्रश्नाचं निरसन करण्याचं ठरवलं आणि बाहुबली-2 दाखवण्याची तयारी दर्शवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *