Mon. Jan 17th, 2022

देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवला आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा काही वेळेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावरील घेतलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान केली.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे आमच्याकडे बहुमत नसल्याचे फडणवीस म्हणाले.देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पदाची शपथ घेतल्यानंतरच्या अवघ्या 79 तासांच्या आत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.    

नव्या सरकारला शुभेच्छा

देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने सत्ता स्थापन करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यावेळी फडणवीस यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *