Tue. May 11th, 2021

नाशिक जिल्हा बँकेची कोंडी फुटणार; राज्य बँकेला मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला राज्य शिखर बॅँकेने त्यांच्या पुनर्गठनाचा निधी देण्याबरोबरच जिल्हा बॅँकेच्या 178 कोटींच्या ठेवींपैकी आवश्यक ती मदत द्यावी असे तोंडी

आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार खात्याला दिले आहेत.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कक्षात जिल्हा बॅँक संचालकांचे शिष्टमंडळ तसेच सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

 

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह सहकारमंत्री सुभाष देशमुख या बैठकीस हजर होते. नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणार असल्याची माहिती

मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच राज्यातील जिल्हा बँकेत असलेल्या जुन्या नोटांचा देखील निकाल लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *