Wed. Jan 26th, 2022

‘देवमाणूस २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

   छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली देवमाणूस मालिका अल्पवधितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. काही महिन्यातच या मालिकेने निरोप घेतला होता. त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येईल का? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तर आता देवमाणूस मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देवमाणूस मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

  देवमाणूस २ मालिकेचा प्रोमो नुकताच झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये डॉ. अजितकुमार देव ही पाटी हटवण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता या मालिकेत प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

  देवमाणूस मालिकेत डॉ. अजित कुमार उर्फ देवील सिंग या बोगस डॉक्टरची कथा रंगवण्यात आली. या मालिकेत बाबू, सरू आजी, टोण्या, डिम्पी, वंदी आत्या, नाम्या ही पात्रे प्रेक्षकांना पाहण्यास मिळाली. तसेच अभिनेता किरण गायकवाड यांनी डॉ. अजित कुमारदेवची भूमिका साकारली होती.

   देवमाणूस मालिकेच्या दुसऱ्या भागात आता अजित कुमार देवची भूमिका कोण साकारणार? तसेच मालिकेतील इतर कलाकारांची बदली होणार का? यावर प्रश्न उपस्थित होत आहे. देवमाणूस मालिकेच्या पहिल्या भागात शेवटला अजितकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि त्यानंतर लगेचच मालिकेचा शेवट करण्यात आला. त्यामुळे आता मालिकेच्या दुसऱ्या भागात नक्की काय दाखवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *