Wed. Oct 27th, 2021

देवोलीनानं कंगना रणौतला सुनावले खडेबोल

बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही तिच्या रोखठोक अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती प्रतिक्रिया देते असते. छोट्या पडद्यावर फार कमी वेळात देवोलीने सर्वाधिक लोकप्रिय मिळवली. तसेच तिने अनेक रियालिटी शोमध्ये देखील काम केलं आहे. देवोलीना ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अनेकदा देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर लिहित असते.

सध्याच्या घडीला देवोलीना ही चर्चेत आली आहे. देवोलीनाने बॉलिवूड क्वीन कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. दुसऱ्यांवर टीका करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वत: मदत कर असा उपरोधिक टोला तिनं कंगनाला लगावला आहे. नवभारत टाईम्सला नुकतीच देवोलीनानं मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं सद्य परिस्थितीवर भाष्य करताना कंगना रणौतला खडेबोल सुनावले. ती म्हणाली, “कंगनानं वायफळ बडबड थांबवावी अन् स्वत: घराबाहेर पडून लोकांना मदत करावी. ऑक्सिजन कुठे मिळतंय, लस मिळवण्यासाठी कुठे आणि कसं रजिस्ट्रेशन करावं, कुठल्या रुग्णालयात उपचारासाठी बेड उपलब्ध आहेत. यासारखी कित्येक काम ती पैसे खर्च केल्याशिवाय देखील करु शकते. इतर सेलिब्रिटी आपापल्या परीनं मदत करत आहेत. ही नुसती लोकांना फुकटचे सल्ले देतेय अन् टीका करतेय.” असं देवोलीनानं कंगनाला सुनावलं. यापुर्वी राखीने देखील कंगनाला खडेबोल सुनावलं होते तसेच अनेक सेलिब्रिटी हे कंगनाला हलक्यात घेत असल्याचं दिसत आहे. कारण ती सतत कोणाला काहीही ना काही म्हणत असते. त्यामुळे तिच्या बोलण्याकडे आणि लिहण्याकडे सेलिब्रिटी हे दुर्लक्ष करत असल्याचं दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *