Fri. Feb 21st, 2020

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त साईबाबांना 7 लाख किंमतीच्या चांदीच्या वस्तू भेट

देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातोय. शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

साईमंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून बाल कन्हैयाचं गुणगान केलं जातं. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासुन चालत आली आहे.

साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी हजेरी लावतात. साईमंदिरात किर्तन पार पडल्यावर रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा होऊन शेजारती करण्यात आली आहे.

कृष्ण जन्माष्टमी दिनानिमित्तानं दिल्लीतल्या नोएडा येथील एका 7 लाख किंमतीच्या चांदीच्या वस्तू साईबाबांना भेट दिल्या. 21 किलो 502 ग्रॅमच्या या वस्तू असून याची एकूण किंमत 7 लाख 74 हजार 72 रुपये आहे. प्रशांत श्रीवास्तव असं या साईभक्ताचं नाव आहे. त्यांनी साईबाबांना चांदीचे सिंहासन, चांदीचा फोटोफ्रेम आणि चांदीचा पाट भेट म्हणून दिलाय.

या सर्व वस्तूंची संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी विधीवत पूजा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *