माघी गणेशोत्सव : सिद्धिविनायक, दगडुशेठच्या गणपतीला भाविकांची अलोट गर्दी

माघ शुद्ध चतुर्थीनिमित्त प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदीरात भाविकांनी अलोट गर्दी केलीय. माघी गणेशोत्सवाला सुरूवात झाली असल्यानं भाविक गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं मंदीरात दाखल झालेत. आज अग्निस्थापना गणहोम, भजन, ओडिसी नृत्य, समर्पण बँड अशा विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलंय.
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात गणेश जयंती साजरी होते.
आज 4 वाजता रथयात्रा निघणार असून गणेशाला तिळाचा प्रसाद दाखवण्यात आला आहे.
त्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
तसंच मंदिराबाहेर रथ सुद्धा ठेवण्यात आला आहे.
मुंबईप्रमाणेच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
तसंच मंदिर विविधरंगी फुलांनी सजवण्यात आलं आहे.
दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.