Mon. Jan 24th, 2022

परदेशी प्रवाशांसाठी ‘डीजीसीए’च्या नव्या मार्गदर्शक सूचना

भारताने आमिओक्रॉन विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन महत्त्वाची पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. डीजीसीएच्यावतीने, भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीनुसार, प्रवाशांना १४ दिवसांचे सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागणार आहे.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘डीजीसीए’च्या मार्गदर्शक सूचना :

  • कोणत्या ठिकाणांचा प्रवास करुन भारतात आले त्या गोष्टींची माहिती देणे बंधनकारक असणार आहे.
  • कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी प्रवाशाला संपूर्ण माहिती देणे अनिवार्य आहे.
  • विमानतळावर आरटीपीसीआरची स्वतंत्र सुविधा असावी जिथे प्रवाशांची चाचणी शक्य होईल.
  • कोविड प्रोटोकॉलचे योग्य पालन करण्यासाठी विशेष काळजी घेणे अनिवार्य आहे.
  • आमिओक्रॉन विषाणूमुळे राज्यात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरीकांचे पूर्ण लसीकरण असणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीसाठी लसीच्या दोन डोसनंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वाहतूक प्रवासासाठी युनिव्हर्सल पास ग्राह्य धरला जाणार आहे.
  • परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांना ७२ तासांच्या आत आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी संख्येनुसार नियमावली तसेच सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक वागणूक अनिवार्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *